Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार
    लोकार्थ

    दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार

    प्रवाशांच्या खिशाला कात्री : जे भाडे ९०० ते दिवाळीत चक्क ४२०० रुपयांवर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 5, 2026No Comments195 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आर्थिक लूट सुरू असल्याचे चित्र आहे. सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेत काही खासगी बस ऑपरेटर्सकडून नियमित भाड्याच्या तुलनेत दोन ते तीन पट अधिक दर आकारले जात आहेत. पुणे ते नागपूर या प्रवासासाठी एसी स्लीपर बसचे तब्बल ४ हजार २०० रुपये, तर पुणे ते जळगाव प्रवासासाठी १ हजार ५०० रुपये भाडे आकारले जात आहे. विशेष म्हणजे दिवाळीनंतर याच मार्गांवरील भाडे मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागपूर आणि जळगावसाठी प्रत्येकी ९०० रुपये आकारले जाणार असल्याचे समोर आले आहे.

    दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी जातात. त्यामुळे रेल्वे आणि एसटी बसमधील गर्दी लक्षात घेऊन अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात. मात्र, याच संधीचा फायदा घेत काही खासगी बस कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही मार्गांवर तर बसचे भाडे ७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचेही समोर आले आहे.

    पुण्यात करण्यात आलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये पुणे-नागपूर आणि पुणे-जळगाव मार्गावरील भाडेवाढीचे वास्तव समोर आले. पुणे ते नागपूर एसी स्लीपर बससाठी सध्या ४ हजार २०० रुपये, तर पुणे ते जळगावसाठी १ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. याउलट दिवाळीनंतर नागपूर ते पुणे आणि जळगाव ते पुणे या दोन्ही मार्गांवर एसी स्लीपरचे भाडे प्रत्येकी ९०० रुपये असणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांकडून कित्येक पट अधिक पैसे उकळले जात असल्याचे स्पष्ट होते.

    दरम्यान, खासगी बसचे भाडे म्हणजे शेअर बाजारासारखे आहे. कधी दर कमी होतात, तर कधी वाढतात, अशी प्रतिक्रिया एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटने दिली. आरटीओकडून तीन पट अधिक भाडे आकारण्याची मुभा असल्याचा दावाही खासगी बस चालकांकडून केला जात आहे. इतर दिवशी डिझेल, पेट्रोल आणि बसच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्याने सणासुदीच्या काळात दरवाढ करावी लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

    मात्र, प्रवाशांच्या खिशाला बसणारा हा अतिरिक्त आर्थिक भार पाहता खासगी बस कंपन्यांच्या मनमानीवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओकडून २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. खासगी बस ऑपरेटर्सकडून जादा भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी आरटीओकडे व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तपासणी मोहीम सुरू असतानाही जादा भाडे आकारणी सुरूच असल्याने आरटीओच्या कारवाईचा धाक खासगी बस कंपन्यांना आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026

    “१५०० पुन्हा सुरू करा!” : दुष्काळग्रस्त महिलांचा एल्गार

    November 4, 2026

    अमूलच्या बटर आणि तुपाच्या किमतीत मोठी वाढ

    November 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif