कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे अप्पर सचिव अजित तायडेंचा सत्कार

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथील पाणीपुरवठा विभागाचे अप्पर सचिव अजित तायडे यांनी जळगाव येथील धावत्या भेटीत कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसाठी वेळात वेळ काढून जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

जळगाव येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जळगाव कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे काम सर्वोत्कृष्ट असून असेच एक दिलाने काम करून संघटना वाढीसाठी कार्य करा, असे आव्हान करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवताना काही अडचणी आल्यास कुठला ही संकोच न बाळगता मला आपल्या सेवची संधी दया असे आव्हावान केले.

जळगाव नगरीत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संलग्न सर्व शाखेच्या वतीने अप्पर सचिव पाणीपुरवठा विभाग मुंबई अजित तयाडे यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे यांची उपस्थिती होती.

सत्कार प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे तालुका अध्यक्ष नितीन सोनवणे सचिव राजीव वानखेडे, वंदना वानखेडे, कार्याध्यक्ष किशोर साळुंखे, राहुल मोरे, कास्ट्राईब मनपाचे कार्याध्यक्ष नंदू गायकवाड, वनविभाग कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे, महसूलचे महेश सपकाळे, कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड, ग्रामविकास अधिकारी देवेंद्र सोनवणे, सारा फाउंडेशनचे डॉ. चंद्रकांत भालेराव डी. एच. भास्कर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.