राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने अमळनेर पत्रकार संघाचे कौतुक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मराठी पत्रकार दिन अमळनेर येथे पत्रकार भवनाच्या नियोजित जागेवर उत्साहात साजरा करण्यात आला.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघास अखिल भारतीय पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधव एकत्रित आले होते, यावेळी मंचावर आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आ डॉ बी एस पाटील,माजी आ स्मिताताई वाघ,ऍड ललिताताई पाटील,खा शि मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे, अध्यक्ष जितेंद्र झाबकश्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला 2022 मध्ये दिवंगत झालेले पत्रकार बांधव राजेंद्र पोतदार यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यांनंतर मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर शहर व तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श पत्रकार संघ म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने अध्यक्ष चेतन राजपूत,सेक्रेटरी चंद्रकांत पाटील आणि उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांचा आमदारांसह मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यानंतर विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी आमदार अनिल पाटील,ऍड ललिता पाटील,डॉ अनिल शिंदे व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,खा शि मंडळाचे उपाध्यक्ष माधुरी पाटील,ऍड तिलोत्तमा पाटील, जेष्ठ पत्रकार पंडीत चौधरी,किरण पाटील चंद्रकांत काटे प्रा. विजय गाढे,बाबूलाल पाटील,उमेश धनराळे,ग्राम विकास शिक्षण संस्था,मारवडचे चेअरमन जयवंत मन्साराम पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, बी. के. सुर्यवंशी, विक्रांत पाटील,महेंद्र बोरसे, शितल देशमुख,शिरीष दादा मित्र परिवार आघाडीचे प्रवीण पाठक, पंकज चौधरी, दीपक चौगुले,पांडुरंग महाजन, सलीम टोपी,योगराज संदानशीव, अनिल महाजन,धनु महाजन,सेना शहरप्रमुख सुरज परदेशी उपस्थित होते. तसेच न प चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, तालुका कृषि अधिकारी भरत वारे,सहा पोलीस निरीक्षक राकेश परदेशी, अशोक पाटील, रणजित शिंदे,सौ वसुंधरा लांडगे, प्रवीण जैन, डॉ. प्रकाश ताडे, भास्कर बोरसे, प्रा. महाजन, संजय पाटील, महेश देशमुख, सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. एम एस वाघ, प्रा. डॉ. अरुण कोचर आदी मान्यवरांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, कार्यक्रमास शहर व ग्रामिण भागातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.