पारोळा : – रस्त्याने पायी जाणार्या एका ७० वर्षीय वृद्धाला दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली असून याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण सहादू भिल (वय ७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
ते रविवारी दुपारी तीनच्या सुमारास रेखाबाई भिल रा. गजानन पळासखेडे (ता. पारोळा) हे दांपत्य एरंडोल येथून दवाखान्याचे काम आटोपून घराकडे रस्त्याने पायी जात असत्तांना यावेळी सार्वे फाट्याजवळ दुचाकी क्र.एम.एच. ४७ ए.एम. ४९७५ वरील चालक मनोज सुरेश भिल रा. भुईपाट (ता. धरणगाव) यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात दुचाकी चालवत श्रावण भिल यांना मागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांना हातापायास व डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना लोकांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. – याबाबत सुखा श्रावण भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत वरील दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद साळी करीत आहे.