Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»पुणे विद्यापीठात उत्तरपत्रिका पाण्यात भिजल्या!
    शैक्षणिक

    पुणे विद्यापीठात उत्तरपत्रिका पाण्यात भिजल्या!

    अवकाळीचा विद्यार्थ्यांनाही फटका : विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 1, 2026No Comments87 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पुणे शहरासह आसपासच्या परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. वादळी वारा अन् गारांसह पाऊस झाला. या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाले. या पावसाचा फटका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला बसला. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पावसाच्या पाण्यात भिजल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात जागा नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

    उत्तर पत्रिका भिजल्या तरी देखील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या उत्तर पत्रिका निकाली काढण्यासाठी संकलित केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे. विद्यापीठ अध्यादेशानुसार अधिकार मंडळामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उत्तर पत्रिका मूल्यमापन पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. सध्या अशा उत्तरपत्रिका निकाली काढण्याची कार्यवाही सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत. या अंतर्गत उत्तर पत्रिका ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

    तर, या घटनेवर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘जर विद्यापीठाला त्या उत्तरपत्रिका जर निकाली काढायच्या होत्या पण एखादा विद्यार्थी जर रिचेकिंगसाठी गेला म्हणजेच पुनर्मूल्यांकनसाठी गेला तर त्याला काय दाखवणार? म्हणजे तो विद्यार्थी नापास झाला त्याचे भविष्य पाण्यात गेलं.’, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली. ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुनर्मूल्यांकनसाठी एवढे पैसे घेतात मग उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी जागा नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ऑनलाइन उत्तरपत्रिका अपलोड केल्या गेल्या आहेत का?,’, अशी प्रतिक्रिया सुद्धा विद्यार्थ्यांनी दिली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif