Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»तामिळनाडूत पुन्हा ट्विस्ट : अण्णाद्रमुक पक्षात फुट!
    राजकारण

    तामिळनाडूत पुन्हा ट्विस्ट : अण्णाद्रमुक पक्षात फुट!

    'टीव्हीके' पक्षाला पाठिंबा देण्याचा घेतला निर्णय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2026No Comments328 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अभिनेता जोसेफ विजय यांनी 10 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तब्बल 5 दिवसांनंतर सत्तास्थापनेचा तिढा सुटला होता. विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या. मात्र, सत्तास्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकीनऊ आले होते.

    सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले. व्हीसीकेच्या दोन आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि सत्तास्थापनेचा तिढा सुटला. मात्र आता सरकार स्थापन करुन विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

    तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एक मोठी उलथापालथ झाली आहे. एआयएडीएमके (अण्णा द्रमुक) पक्षातील अंतर्गत कलह आता उघडपणे समोर आला आहे. अण्णाद्रमुकच्या षण्मुगम गटाचा टीव्हीके सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता काठावर बहुमत असलेल्या विजय सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. एआयएडीएमके नेते सी.व्ही. षण्मुगम यांनी म्हटले, आम्ही जनतेचा कौल (जनादेश) स्वीकारतो. जनतेचा हा कौल केवळ ‘टीव्हीके’ या पक्षासाठी नाही, तर तो विजय यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी होता. आम्ही मुख्यमंत्री विजय यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ‘टीव्हीके’ सरकारला आमचा पाठिंबा जाहीर करतो, असं सी.व्ही.षण्मुगम म्हणाले.

    सी.व्ही.षण्मुगम म्हणाले की, आम्ही या पक्षाची स्थापनाच ‘डीएमके’ (द्रमुक) पक्षाच्या विरोधात केली होती. गेल्या 53 वर्षांपासून आमचे राजकारण हे प्रामुख्याने ‘डीएमके’ ला विरोध करण्याभोवतीच फिरत आले आहे. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, ‘डीएमके’ च्या पाठिंब्याने एआयएडीएमके चे सरकार स्थापन करण्याचा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, आमच्या पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी ही कल्पना फेटाळून लावली आणि तिला तीव्र विरोध केला. जर आम्ही ‘डीएमके’ सोबत युती केली असती, तर एआयएडीएमकेचे अस्तित्वच धोक्यात आले असते. आमच्या सदस्यांना अशी परिस्थिती कदापि मान्य नव्हती. सध्या आम्ही कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे उभे आहोत. त्यामुळे आता आमचे संपूर्ण लक्ष हे आमच्या स्वतःच्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यावर आणि तो अधिक बळकट करण्यावर केंद्रित करणे गरजेचे आहे. म्हणूनच, आम्ही विजयी ठरलेल्या ‘टीव्हीके’ या पक्षाला आमचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सी.व्ही.षण्मुगम यांनी स्पष्ट केलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग

    September 6, 2026

    बापटांवर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा सन्मान

    September 6, 2026

    सरकार हे कॉक्रोच जनता पार्टीसमोर झुकत आहे!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif