धक्कादायक : आई स्वप्नात आली अन्‌ मुलाची आत्महत्त्या!

चिठ्ठीत सांगितले कारण : सोलापुरात हळहळ

0

सोलापूर : जुळे सोलापूरमध्ये एका 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी दुपारी ही घटना म्हाडा कॉलनीत घडली. विद्यार्थ्यांने मामाच्या घरी गळफास घेतला. शिवशरण भुताळी तळकोटी असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा ससाणे कॉलनी, केशव नगर, पुणे येथील होता. सध्या तो जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीत राहत होता. त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने त्याच्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. आईच्या निधनानंतर तो तणावात होता, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
शिवशरणने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मी शिवशरण. मी मरत आहे. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते, पण मी मामा आणि आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. ‘तू जास्त तणावात का आहेस? माझ्याकडे ये..’ असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले.. मामा…. मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचे आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलेस. त्याबद्दल धन्यवाद. तुमचा पिंट्या….’
शिवशरणने या चिठ्ठीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने आईच्या आठवणीने आणि तिच्या स्वप्नात येण्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले आहे. तसेच, मामा आणि आजीने त्याला दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.