स्वातंत्र्य लढ्यात अण्णाजी चत्रु वाणी यांचे योगदान

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

१५ ऑगस्ट २०२२ ! भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिन ! या स्वातंत्र्यासाठी, इंग्रजांच्या तावडीतून भारतमातेला मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी कष्ट केले. तुरुंगात गेले, इंग्रजांचा छळ सहन केला, प्रसंगी गोळ्या झेलल्या, फासावरही चढले. लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल सरहद्द गांधी, साने गुरुजी, लाला लजपतराय, मौलाना आझाद आदिंनी शांतीच्या मार्गाने लढा दिला. सरदार भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, शिरीष कुमार, स्वातंत्र्यवीर सावरकर आदिंनी प्राण तळहातावर घेऊन सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी मोठाच त्याग केला. या सर्वांच्याच कार्याचे, त्यागाचे, समर्पणाचे स्मरण आपण करतो.

या स्वातंत्र्य लढ्यात जळगाव शहरातील भवानी पेठ येथील रहिवासी स्वातंत्र सैनिक कै. अण्णाजी चत्रु वाणी यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला बऱ्याच वेळेस तुरंगातही गेले.

इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनात सक्रिय होते. मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, वंदे मातरम चळवळ, स्वदेशीचा पुरस्कार, विदेशी मालावर बहिष्कार, खादीचा प्रचार आणि वापर याबाबत अण्णाजी वाणी यांनी आंदोलनामध्ये त्यांनी हिरारीने भाग घेतला.

मिठाचा सत्याग्रह आंदोलनात महात्मा गांधीजी सोबत अण्णाजी वाणी यांनी भाग घेतला अन त्यांना जेल झाली. त्यांना धुळे येथील कारागृहात बरेच दिवस डांबून ठेवले. जेलमधून सुटल्यावर ते गप्प बसले नाही, बऱ्याच अशा आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. अन्  देशसेवेचा वसा त्यांनी घेतला. नंतर त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी फ्रुटचा व्यवसाय केला. त्यांना चार मुले व तीन मुली असा परिवार. वडिलांचा आदर्श घेत मोठे चिरंजीव कै. दत्तात्रय अण्णाजी वाणी यांनी सुध्दा बरेच दिवस  विविध आंदोलनामध्ये भाग घेतला या कारणाने जेलची सजा भोगली. त्यांची चारही मुले व तीन मुली यांनी सुद्धा समाजात सामाजिक कार्य करीत जीवन अर्पण केले.  आज ही यांचे चिरंजीव सुरेश अण्णाजी खारोळे हे डोंबिवलीत वास्तव्यास आहे.

आज सुद्धा जळगाव शहरात त्यांचे वारस प्रभाकर अण्णाजी खारोळे ज्वेलर्स, सुप्रभा ज्वेलर्स, अशोक अण्णाजी सराफ भुसावल,  प्रकाशचंद्र दत्तात्रय आणि कंपनी जळगाव नावाने फर्म चालवीत आहे. तसेच आण्णाजी यांच्या परिवारातील सदस्य सर्वत्र क्षेत्रात देशात विदेशात आपला ठसा उमवटीत आहे. स्वातंत्र्य संग्रामात विशेष असे कार्य अण्णाजी चत्रु वाणी यांनी केले. त्यामुळे प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी त्यांना गाडी पाठवीत असे तसेच शासनामार्फत त्यांना 11 एकर जमीन बक्षीस म्हणून शासनाने दिली.

आज देशाची प्रगती होत असतांना त्याचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र या स्वातंत्र्य सैनिकांनी तनमनधनाने त्याग केला नसता तर स्वातंत्र्यच मिळाले नसते ही बाब लक्षात ठेवून आपण आज या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करूया ! त्यांच्या स्मृतींना अभिवादन करू या आणि म्हणू या.. “जय हिंद !!! भारत माता की जय !!! वंदे मातरम !

आजोबा कै. अण्णाजी चत्रू वाणी सलाम तुमच्या कार्याला..  

– नातू सुनील वाणी, जळगाव व सर्व परिवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here