ren faire bristol coupons coffee cup promotional gifts candlestone gifts sanskrit baby names meaning gift of god amazon com american express gift card the gift looks good on you donald lawrence lyrics
Monday, December 5, 2022

धक्कादायक.. विवाहापूर्वीच 23 वर्षीय तरुणीची आत्महत्या

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

तालुक्यातील अंजाळे (Anjale) गावातील लग्न घटकाजवळ (before marriage) आलेल्या तरूणीने आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या (suicide) केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये (Yaval Police Station)  आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मिनल निवृत्ती भागवत (वय २३, रा. नविन प्लाट क्षेत्र अंजाळे तालुका यावल) या तरुणीने दिनांक १५ आक्टोबर २o२२ रोजी सकाळी १o वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अ.मृ .र ६५ / २०२२ प्रमाणे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळीनंतर होणार होता अशी माहीती मिळत आहे. दरम्यान विवाह घटिका जवळ आली असता तरुणीने आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित होते. दरम्यान मयत तरूणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पवन जैन यांनी केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या