अनिल पाटील, छगन भुजबळांना संधी?

0

जळगाव ;- अजित पवार गटाचे वादग्रस्त नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी बहुप्रतिक्षित राजीनामा आज सकाळी दिल्याचे समोर आले आहे. अजित पवार गटाचे दुसरे वादग्रसव्त मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील अडचणीत सापडले असून विरोध त्यांच्याही राजीनाम्याची मागणी करीत असून रिक्त जागेवर अमळनेर विधानसभेचे सदस्य अनिल भार्इसाद पाटील व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंडे यांच्या चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांसह भाजपच्या काही आमदारांनी मंत्री मुंडे यांचा राजीनामा मागितला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रश्नी रान उठविल्यानंततर मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडले. महायुतीच्या सरकारमध्ये अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन मंत्रीपद होते. दुसऱ्या टर्ममध्ये माथ त्यांचे नाव वगळण्यात आले होते.

छगन भुजबळांचेही नाव चर्चेत
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदापासून लांब ठेवल्याने त्यांना उघड नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री. भुजबळ यांनी सबुरीचा सल्ला दिला होता. आता भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.