मोठी बातमी.. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड

1

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर ED ने धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.

तुरूंगाची हवा खावी- सोमय्या

दरम्यान भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना इशारा देत म्हणाले की, आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे. अनिल परब यांच्या निवासस्थानी व राज्यात सात ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापासत्र सुरू केले. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.

आता परब यांची वेळ- सोमय्या

या पार्श्वभूमीवर बोलताना सोमय्या म्हणाले, “बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे”.

“यशवंत जाधव यांच्या दुबई संबंधांची ईडीने चौकशी केली असून हसन मुश्रीफ व अन्य नेत्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होईल,” अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केली.

 

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    फडणविस मुख्यमंत्री असतांना किती मंत्रयांवर भ्रष्टलाराचे आरोप झाले . तेव्हा सर्वांना क्लिनचीट दिली . तेव्हा ED काय करीत होती . आपलं ते बाळ व लोकांचे ते कार टे अस चालू आहे. . याच्याने सत्ता बदा झाला म्हणजे वैरभाव व काढला जाईल . सर्वांना एकच न्याय दिला जातो कां ?

Leave A Reply

Your email address will not be published.