Tuesday, May 24, 2022

मोठी बातमी.. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा ताबा CBI कडे

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुखांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.

- Advertisement -

सीबीआयकडे कस्टडी देण्याच्या निर्णयाला देशमुखांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र अनिल देशमुखांची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार दिला. न्यायमूर्तींनी याचिका दुसऱ्या खंडपीठाकडे सादर करण्याचे निर्देश देत कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे.

अनिल देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगातून सीबीआयने ताब्यात घेतले आहे. केंद्रीय संस्थेने त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. याबाबत देशमुखांचे वकील दुपारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यापुढे पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या कस्टडीला देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिलं होत. सीबीआय आता देशमुख यांना सीबीआय कोर्टात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान अनिल देशमुख हे दोन दिवसांपुर्वी कारागृहामध्ये चालताना पडले होते, यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागला होता. यामुळे अनिल देशमुख यांना उपचारासाठी शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. त्यांनी अस्थिभंग विभागात दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांचा एमआरआय करण्यात आला होता.

अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात येणार होता. मात्र, देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे सीबीआय अधिकाऱ्यांना आणखी काही काळ वाट लागली. ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या