Friday, May 20, 2022

कारागृहात पडले अनिल देशमुख; उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कारागृहात चालत असतांना पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सदर घटना शुक्रवारी घडली होती. अशी माहिती मिळत आहे. सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

- Advertisement -

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल देशमुखांना उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख जेलमधील बाथरूम मध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे. चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या