ब्रेकिंग.. अनिल देशमुखांना जामीन मंजूर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तब्बल १३ महिन्यांनंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत.

ठाकरे सरकारच्या काळातील गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे सध्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी तुरुंगात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन दिला, यानंतर त्यांच्या जामीनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. या जामीनाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी सीबीआयने कोर्टाकडे 10 दिवसांची स्थगिती मागितली होती, ती कोर्टाने मान्य केली.

Leave A Reply

Your email address will not be published.