Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»संतप्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवला!
    जळगाव

    संतप्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संतप्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवला!

    शेतकरी उद्विग्न : चिंचपूर ढगे गावात मोठा गोंधळ

    धाराशिव | लोकशाही न्यूज नेटवर्क

    धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने शेतातील पिके हिरावली आहेत. तर अनेकांचे शेत वाहून गेले आहे. या भयानक पावसात जनावरे देखील मेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. पण भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात वेगळा प्रकार बघायला मिळाला. या गावात शेकडो जनावरे वाहून गेले आहेत. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन गावात पाहणीसाठी आल्यानंतर शेतकरी उद्विग्न झाले.

    चिंचपूर ढगे गावच्या शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा थांबवला. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. जनावर मेली आहेत. तात्काळ मदत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ‘मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो. मी पैसे घेऊन आलो नाही’, असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे जाणे पसंत केले.
    मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना सांगितले की, हा मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मदतीबाबत ठरवतील. नुकसान खूप मोठे आहे. याची जाणीव आहे. मी दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसोबत बोलत आहे. मी दौऱ्यावरच आहे. काल रात्री बीडला होतो. काल जळगावला होतो, आज धाराशिवला आलो आहे. पुढे सोलापूरलाही जातोय, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

    योग्य निर्णय घेतला जार्इल!
    मी मुख्यमंत्र्यांसोबत सर्व चर्चा केलेली आहे. सरकार योग्य निर्णय घेतील. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्थिती आहे. जिथे ओला दुष्काळ होता तिथे ओला दुष्काळ जाहीर केला जाईल. आवश्यक असेल त्या ठिकाणी आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू. ओला दुष्काळ जिथे असेल तर त्याबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली

    Angry farmers blocked Girish Mahajan's convoy Dharashiv girish mahajan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif