Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»वरणगावला वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संताप
    जळगाव जिल्हा

    वरणगावला वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संताप

    राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून वीज अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून अनोखा निषेध
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 26, 2026No Comments134 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    वरणगाव

    शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या वाढत्या त्रासाला कंटाळून भर दुपारी याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) चे पदाधिकारी वीज कार्यालयात गेले असता अभियंता हजर नसल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी खुर्चीला हार घालून अनोखा निषेध व्यक्त केला.

    शहरात वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसांपासून कधी विजेच्या तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी करण्यासाठी, कधी रोहित्र दुरुस्तीसाठी, तर कधी तुटलेल्या तारांची पुनर्जोडणी करण्यासाठी वीज केंद्रातून तीन ते चार तासांचा परवाना घेऊन सकाळच्या सुमारास वीज पुरवठा खंडित केला जातो. याची पूर्वकल्पना मोबाईलच्या माध्यमातून दिली जात असल्याने वीज ग्राहक पर्यायी व्यवस्था करून तयार राहत होते. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर होत आहे.

    वीज पुरवठा का खंडित झाला, याबाबत विचारणा करण्यासाठी कार्यालयात किंवा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांचा संताप अधिक तीव्र होत आहे. कडक उन्हाळ्यात घरात किंवा बाहेर अंगाची लाहीलाही होत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, तसेच व्यावसायिकांनाही याचा फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी झोपमोड होत असून विचारणा केली असता ‘तांत्रिक कारण’ सांगितले जाते.

    दि. २५ रोजी १३२ केव्ही वीज केंद्राने सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित ठेवला. यामुळे संतप्त राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) च्या पदाधिकाऱ्यांनी वीज कार्यालय गाठून अभियंत्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज अभियंता कार्यालयात हजर नसल्याने पदाधिकाऱ्यांनी सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. अभियंत्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी मुक्ताईनगरचा पदभार असल्याचे सांगितले, तर कार्यकारी अभियंता सुट्टीवर असल्याने कार्यालयात उपस्थित नव्हते. यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपअभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोखा निषेध व्यक्त केला.

    आंदोलनाचा इशारा

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) तालुका अध्यक्ष दिपक मराठे, नगरसेवक इरफान सय्यद, प्रतिभा तावडे, कुलदीप देशमुख, राहुल जोहरे, एहसान अहमद, जुनेद शाह, जितेंद्र तावडे यांनी सांगितले की, वीज देयके वेळेवर भरूनही नागरिकांना वीजेच्या लपंडावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

    वीजेची परिस्थिती

    शहरात पूर्वी सुमारे २०० अश्वशक्तीपर्यंत वीज वापर होत होता. मात्र उन्हाळा सुरू झाल्यापासून तो २३० अश्वशक्तीपर्यंत वाढला आहे. त्यामुळे रोहित्रांवर अतिरिक्त ताण येत आहे. तसेच तीव्र उन्हामुळे वीजवाहक तारा तुटण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे समस्या अधिक तीव्र झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फुलगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर शहराची वीज जोडणी तेथून करण्यात आल्यास वीज वितरण अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif