जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकता संघटनेचे तीव्र आंदोलन
वक्फ संशोधन बिल परत घेण्याची मागणी
जळगाव: प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 विरोधात एकता संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १७ मार्च रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि “धर्मनिरपेक्ष” राजकीय पक्षांच्या जागृतीसाठी घोषणाबाजी करत विधेयकाचा तीव्र विरोध करण्यात आला.
संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी निदर्शकांशी संवाद साधताना सांगितले की, हे विधेयक वक्फ मालमत्तांवर हक्क गमावण्यास प्रवृत्त करणारे असून, मुस्लिम समुदायावर थेट हल्ला आहे.” संशोधनाच्या नावाखाली वक्फ मालमत्तांच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा केला जात आहे.वक्फ बोर्ड व कौन्सिलमध्ये गैर-मुस्लिम सदस्यांची भर घालण्याची तरतूद केली जात आहे, जी हिंदू आणि शीख धर्माच्या संस्थांमध्ये नाही.संविधानिक हक्कांची पायमल्ली होत असून मुस्लिम समाजाच्या मागण्या पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जात आहेत.
फारूक शेख पुढे म्हणाले की,”संसदीय समितीला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ३.६ कोटींपेक्षा जास्त ईमेल पाठवून आक्षेप नोंदवले. तसेच, ५ कोटी मुस्लिमांनी संयुक्त समितीला विधेयकाविरोधात पत्रव्यवहार केला, विरोधी पक्षांनी सुचवलेल्या ४४ सुधारणा नाकारण्यात आल्या, सत्ताधारी पक्षाने समितीमध्ये वर्चस्व गाजवत विधेयक अधिक कठोर आणि वादग्रस्त केले.
“लोकशाहीत कोणताही कायदा तयार करताना संबंधित समुदायांशी चर्चा केली जाते. मात्र, या विधेयकाच्या बाबतीत सरकारने हुकूमशाही भूमिका घेतली आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.संघटनेने एनडीएच्या सहयोगी पक्षांवरही टीका करत म्हटले की, “जे पक्ष मुस्लिम मतांसाठी प्रयत्न करतात, ते भाजपच्या सांप्रदायिक अजेंड्याचे समर्थन करत आहेत.” आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “वक्फ विधेयक परत घ्या!”, “लोकशाहीत हुकूमशाही चालणार नाही!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अध्यक्ष, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, आणि अल्पसंख्यांक मंत्री यांना हे विधेयक संसदेत पारित करू नये, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात मुफ्ती अतिकउर रहमान, मुफ्ती खालीद, मुफ्ती अनास, मौलाना रहीम पटेल, मौलाना तोफिक शाह,मौलाना शफी पटेल, मौलाना कासिम, मौलाना मुक्तार पटेल, फारुक शेख, मजहर खान, अनिस शहा, मतीन पटेल, मुक्तदिर देशमुख, युसुफ खान, अन्वर खान, सलीम इनामदार, आरिफ देशमुख, महमूद सर, मुक्तदिर देशमुख, मुक्तार पटेल, चाळीसगावचे अमजद खान, मुक्ताईनगर चे कलीम मणियार, हकीम चौधरी, अडावद चे शब्बीर शेख, सावदा चे असलम खान सय्यद ,अजगर अजमल खान, वाघोदा चे शेख चांद, पाचोराचे रफीक शाह व खालील शाह, पाळधी जावेद पिंजारी ,फारुख शहा, शिरसोलीचे दानिश, भडगाव चे जाकीर कुरेशी, मुनसफ खान, मोहम्मद हसीन, वसीम खान ,मोहसीन खाटीक वरणगाव चे कय्यूम शेख व सौ निगार शेख, जळगाव चे ताहेर शेख ,सय्यद आरिफ, मोहम्मद परवेज, आसिफ अजगर, अन्वर खान, हा फिस खान, मोहम्मद मेहमूद, वसीम खान, मुक्तार अनिस, अनिस मणियार, मुस्ताक करीमी,साबीर मुस्तफाबादि, मोई नोद्दीन, रफिक पिंजारी, फजल शेख, मोहम्मद इदरीस, अब्दुल करीम, वसीम शकील ,जकी पटेल, अब्दुल हमीद, अमळनेरचे सय्यद हुसेन, मोहम्मद खलील, शेख रहीम, अजमल खान, सय्यद कलीम, नाझीम अली, मोहम्मद मुस्ताक बादलीवाले, मुक्तार शेख ,तोफिक शाहिद, अतिक तेली, नाजमोद्दीन, सोहेल उमर, मोहसीन युसुफ, नईम खाटीक, मुजफ्फर खान, मोहम्मद इरफान आदी शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती.