
अनन्य ईश्वरभक्ती- भाग- ७
एकनिष्ठ भक्तीचे १ प्रत्यक्ष उदाहरण,
एकदा संत तुलसीदासांना भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिले। प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले तरी तुलसीदासांनी त्यांना वंदन केले नाही। संत तुलसीदास त्यांना म्हणाले, हे रामा, आज तुमचे रुप काही वेगळेच, अलौकिक आहे, परंतु हे तुलसीदासाचे मस्तक तुमच्या पुढे तेव्हाच नतमस्तक होईल जेव्हा तुम्ही हातात धनुष्यबाण घ्याल। नंतर भगवान श्रीकृष्ण राम रुपात प्रगट झाले व रामाला तुलसीदासांनी वंदन केले। याला म्हणतात एकनिष्ठ भक्ती। “कहा कहू छवि आपकी, भले बने हो नाथ। तुलसी मस्तक तब नवै, धनुष बाण लो हाथ॥“– गोस्वामी तुलसीदास जी महाराज॥१॥ कित मुरली कित चन्द्रिका। कित गोपियन को साथ। अपने जन के कारणे श्री कृष्ण भये रघुनाथ॥२॥ “हे भगवान ! आज आप इतने सुंदर और आकर्षक लग रहे है कि, मैं इसे शब्दों में वर्णित नहीं कर सकता, लेकिन, हे भगवान, मेरा सिर तभी झुकेगा जब आप अपने हाथ में धनुष और बाण धारण करेंगे। इस स्थान पर भगवान कृष्ण ने भगवान राम के रुप मे गोस्वामी तुलसीदास जी को दर्शन दिए थे। गुरुदीक्षा घेतल्यावर कोणत्याही मंदिरात गेल्यावर सुध्दा आपल्याच गुरुंना त्या देवात पाहायला पाहिजे।
यथा तरोर्मूलनिषेचनेन, तृप्यन्ति तत्स्कंधभुजोपशाखा:।
प्राणोपहाराश्च यथेन्द्रियाणाम्, तथैव
सर्वार्हणमच्युतेज्या॥१४॥ भागवत॥४-३१-१४॥
भागवत पुराण-स्कन्ध-४, अध्याय ३१, श्लोक १४॥
प्रचेताओं को नारद का उपदेश-श्लोक १४॥
ज्याप्रमाणे झाडाच्या मूळाला पाणी दिल्याने त्याच्या फांद्या, खोड, शाखा उपशाखा, पाने, फळे सर्वांना पाणी दिल्यासारखे होते, निषेचनेन-सींचनेसे, खोड, प्राण वायु, जेवण केल्याने जसे सर्व इंद्रियांचे पोषण होते, त्याच प्रमाणे, एका ईश्वराची पूजा केल्याने सर्व देव-देवतांची पूजा केल्यासारखे होते। त्यासाठी त्यांची वेगळी पूजा करण्याची गरज नाही। [उपहारात्-भोजन केल्याने] ज्याप्रमाणे इंद्रियांचे पोषण होते। (जिस तरह वृक्ष की जड को सींचनेसे तना, शाखाएं, तथा टहनियां पुष्ट होती हैं, और जिस तरह पेट को भोजन देने से शरीर की इन्द्रियां तथा अंग प्राणवान् बनते है, उसी प्रकार भक्ती द्वारा भगवान की पूजा करने से भगवान् के ही अंग रूप सभी देवता स्वत: तुष्ट हो जाते है।
आलोड्य सर्व शास्राणि विचार्य च पुन: पुन:।
इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायणो हरि:॥
॥ शुकाचार्य पुराण॥
सर्व शास्रांचा पुन्हा पुन्हा अभ्यास व चिंतन केले असता एकच निष्पन्न होते कि, नारायणाचे, ईश्वराचे ध्यान करावे।
तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राम्हण:।
नानुध्यायान् बहून् शब्दान् वाचो विग्लापनं हि तत्॥
बृहदारण्यक-उपनिषद॥
अनेक शास्रांचे वाचन करण्याची गरज नाही, तो एक वाणीचा अभ्यास आहे। वाणीचा विलास आहे। शास्रांचा सार एवढाच आहे कि, त्या परम तत्वाला, ईश्वराला जाणुन घेऊन त्याचेच ठिकाणी लक्ष्य लावावे। त्याचे ध्यान, चिंतन करावे। इतर फक्त वाणी ची बडबड आहे।
॥तावद् गर्जन्ति शास्राणि जंबुका: विपिने यथा। न गर्जति महाशक्तिर्यावद् वेदान्तकेसरी॥१॥

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

