Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अध्यात्म»एकेश्वर एकनिष्ठ भक्ती समजून घेणे आवश्यक!
    अध्यात्म

    एकेश्वर एकनिष्ठ भक्ती समजून घेणे आवश्यक!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 10, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अनन्य ईश्वरभक्ती- भाग- ६

     

    माझी मूर्ति निफजवी।

    ते घराचे कोनी बैसवी।

    आपण देवो देवी।

    यात्रे जाय॥८१५॥

    माझी मूर्ती तयार करतो व तिची घराच्या एका कोपर्यात स्थापना करतो आणी आपण मात्र इतर देवदेवतांच्या यात्रा करीत हिंडतो। नित्य आराधन माझे। काजी कुळदैवता भजे। पर्वविशेषें कीजे। पूजा आना॥८१६॥ रोज माझी पूजा करणे अवश्य असता ती सोडून कार्यप्राप्तीकरिता कुळदेवतेची पूजा करतो, आणि एखादी विशेष पर्वणी आली असता तिसर्याच देवतेची पूजा करतो। माझे अधिष्ठान घरी। वोवसे (नवस) आनाचे करी। पितृकार्यावसरी। पितरांचा होय॥८१७॥ माझी घरात स्थापना केली असतांना दुसर्या देवाला नवस करतो किंवा इतर देवतांची व्रते करतो व श्राघ्दकाळी पितरांची पूजा करणारा पितृभक्त होतो। ।

    एकादशीच्या दिवशी। जेतुला पाडु आम्हांसी।

    तेतुलाचि नागांसी। पंचमीच्या दिवशी॥८१८॥

    एकादशीच्या दिवशी जेव्हड्या आदराने माझी भक्ती करतो तेव्हड्याच आदराने नागपंचमीच्या दिवशी नागास भजतो॥८१८॥ चौथ मोटकी पाहे। आणि गणेशाचाचि होये। चावदशी म्हणे माये। तुझाचि वो दुर्गे॥८१९॥ गणेशचतुर्थीचा नेमका दिवस उगवल्यावर गणपतीचीच पूर्ण भक्ती करणारा भक्त होतो, व चतुर्दशीचे दिवशी देवीचे पूजन करुन “हे अंबे दुर्गे !” मी तुझाच आहे, अशी मनोभावाने प्रार्थना करतो॥८१९॥ नित्य नैमित्तिके कर्में सांडी। मग बैसे नवचंडी। आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री॥८२०॥ नित्यनैमित्तिक कर्मे अवश्य केली पाहिजेत। ती टाकून देतो आणि मग नवरात्रात नवचंडीचा पाठ एके जागी बसून करतो; आदित्यवार आला म्हणजे बहिरोबाच्या नावाने खिचडा वाटतो॥८२०॥

    पाठी सोमवार पावे। आणि बेलेंसी लिंगा धावे।

    ऐसा एकलाचि आघवे। जोगावी जो॥८२१॥

    नंतर सोमवार आला म्हणजे बेल घेऊन शिवपिंडीस वाहण्याकरता धावतो व याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची [कशी तरी] सेवा, भक्ती करतो॥८२१॥

    ऐसा अखंड भजन करी।

    उगा नोहे क्षणभरी। अवघेन गांवद्वारी।

    अहेव जैसी॥८२२॥

    गावाच्या वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या ही ज्याप्रमाणे अखंड सौभाग्यवतीच राहते, त्याप्रमाणे जो क्षणभर ही स्वस्थ बसत नाही, (विषय प्राप्तीकरिता) असतील त्या सर्व देवांची अखंड पूजा, भक्ती करतो॥८२२॥

    ऐसेनि जो भक्तु। देखसी सैरा धावतु।

    जाण अज्ञानाचा मूर्तु। अवतार तो॥८२३॥

    याप्रमाणे जो देवांची भक्ती करीत वाटेल तसा चोहोकडे धावत असल्याचे पाहशील तो अज्ञानाचा मूर्तीमंत अवतारच होय; असे समज॥८२३॥ ज्ञानेश्वरी-अध्याय १३ वा॥

    रोज माझी पूजा करणे आवश्यक असतांना ती सोडून कूळदेवतेची पुजा करतो। विशेष पर्वणी आली कि तिसर्याच देवतेची पुजा करतो। माझी स्थापन केलेली असताना दुसर्या देवाला नवस करतो। श्राध्दकाळी पितरांची पुजा करतो। गणेश चतुर्थीला गणेशभक्त होतो। चतुर्दशीला देवीची पूजन करुन “हे अंबे दुर्गे!” मी तुझाच आहे, अशी मनोभावे प्रार्थना करतो। गावाव्या वेशीत बसलेली वेश्या जशी अखंड सौभाग्यवती असते असा हा भक्त असतो अशा शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी या अज्ञानी भक्ताचे वर्णन केले आहे, ते पुढील भागात बघू..

    डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
    रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
    नांदगाव, जि. नाशिक
    मो. ९८२२४२८५७२

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नवापूरच्या एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग

    May 12, 2026

    वैदिक धर्माच्या उद्धाराचे शिल्पकार : आद्य शंकराचार्य

    April 23, 2026

    ‘जातीभेद गाडून हिंदू म्हणून संघटित व्हा!’

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif