Saturday, October 1, 2022

आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

- Advertisement -

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत आपली सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anand Adsul) यांनी शिवसेना (Shivsena) नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनाम्याचं पत्र पाठवून दिलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच ईडीने (ED) केलेल्या कारवाईवेळी आणि आजारपणात पक्ष नेतृत्वाकडून विचारपूसही करण्यात आली नाही अशी खंत आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी (City Co-Operative Bank Scam) ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, आनंदराव अडसुळ यांचा मुलाग अभिजीत अडसूळ (Abhijeet Adsul) हा आधीच एकनाथ शिंदे गटासोबत (Eknath Shinde Group) आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळही शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या