Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»पालक-शिक्षकांचे समुपदेशन करण्याची नितांत गरज!
    महाराष्ट्र

    पालक-शिक्षकांचे समुपदेशन करण्याची नितांत गरज!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 22, 2026No Comments39 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    साहिल वाकोडे या आयआयटीच्या विद्यार्थ्याने नुकतीच आत्महत्या केली. विद्यापीठाचे अधिष्ठाता पदावरून दूर करण्यात आले. मात्र विद्यार्थांचा जीव पुन्हा जिवंत होईल का? विद्यार्थी आत्महत्येची घटना घडली की दोषी कोण, कोणावर निलंबनाची कारवाई करायची, याची चर्चा सुरू होते. मात्र, एका तरुणाचा गेलेला जीव कोणतीही कारवाई परत आणू शकत नाही. त्यामुळे अधिष्ठात्यांचे निलंबन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनातील ताण समजून घेणे, पालक आणि शिक्षकांचे समुपदेशन करणे आणि त्यांच्यात संवादाची नवी दारे उघडणे गरजेचे आहे, अशी भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

    शिक्षणाचा वाढता ताण, परीक्षेची भीती, अपेक्षांचे ओझे, करिअरची चिंता आणि घरातील तसेच महाविद्यालयातील दबाव यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक संघर्षातून जात असतात. मात्र हा संघर्ष अनेकदा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. मनातले दुःख व्यक्त करण्यासाठी सुरक्षित व्यक्ती किंवा जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलतात. आम्हाला शिक्षा नको, समजून घेणारे मोठे हवे आहेत,‌’ ही विद्यार्थ्यांची भावना व्यवस्थेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केवळ प्रशासकीय कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी पालक, शिक्षक, प्राध्यापक, महाविद्यालयीन प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यात नियमित संवाद आवश्यक आहे.

    पालकांनीही मुलांकडून केवळ गुण, नोकरी किंवा यशाची अपेक्षा न करता त्यांच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलांकडे संवेदनशीलतेने पाहावे. तर सरकारने प्रत्येक शैक्षणिक संस्थेत प्रभावी मानसिक आरोग्य व समुपदेशन व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. एक विद्यार्थी गमावल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, पुढचा विद्यार्थी गमावला जाऊ नये यासाठी व्यवस्था उभी करणे अधिक महत्त्वाचे आहे.

    निलंबनाची कारवाई झाली तर एखाद्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित होऊ शकते; पण समुपदेशन आणि संवादामुळे कदाचित एखादा जीव वाचू शकतो. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय नव्हे, तर मानवी आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहावे, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif