gift eternal rainbow 3gp sub indo step dad birthday gifts 2001 a space odyssey gifts methylphenidate hcl er 20 mg coupon rebel brewer coupons
Thursday, December 1, 2022

खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला अटक

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
जामनेर येथील तीस वर्षीय इसमाचा खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, असून जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी विरोधात जामनेर पोलिस स्थानकात भाग 5 गु.र.नं. 294/2022 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपापसात वाद होऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी हा खून झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, 25 जून 2022 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जामनेरच्या गंगापुरी गावातील एका पती-पत्नीला पळसाच्या झाडाखाली एक इसम मरून पडला असल्याचे आढळून आले होते. सदर बाब जोडीदार वॉचमन देविदास नथू सोनवणे याला सांगून जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात कारणने अज्ञात व्यक्तीच्या खुनाबाबत कळवण्यात आले होते. जामनेर पोलिसांतर्फे मयत इसमाचा खून केल्याप्रकरणी तपास सुरू असताना, चिंचखेडा येथील वनविभागात वाचमन असणाऱ्या आरोपी नथू काळू सुरळकर, वय 28, रा. चिंचखेडा, ता. जामनेर याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
आरोपी नथू सुरळकर हा ड्युटीवर असताना मयत श्याम फकीरा ठाकरे हा त्याच्या झोपडी जवळ दारू पिलेल्या अवस्थेत येऊन त्याला शिवीगाळ करत होता. दरम्यान मयत श्याम ठाकरे याला समजावून देखील तो ऐकत नसल्याने याचा राग येऊन नथू सुरळकर याने रागाच्या भरात जवळ असलेल्या फावड्याच्या दांड्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
दरम्यान सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना 14 जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहा.पो. नि. जालिंदर पळे, पोलीस अमलदार, पो.हे.कॉ. सुनील दामोदर, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, पोलीस नाईक रणजीत जाधव, किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील ईश्वर पाटील दर्शन ढाकाने, प्रमोद ठाकूर या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या