Wednesday, September 28, 2022

शेतातील विहिरीत आढळला अनोळखी मृतदेह

- Advertisement -

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

धरणगाव शहरातील सोनवड रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका शेतातील विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शेतात काही दिवसांपूर्वी मक्का पिकांची काढणीचे काम संपल्याने शेत मालक आणि दोन तीन शेतमजूर पाणी घेण्याची विहिरीवर गेले. यावेळी त्यांना विहिरीत मृतदेह आढळून आला. दरम्यान धरणगाव पोलिस ठाण्यात तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली.

त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. मृददेहाचा उजव्या हातावर आकाश नाव गोंदलेले असून अंगात चौकडीचा निळ शर्ट व काळी पॅन्ट असुन सदर ओळख पटविण्याचे आव्हान धरणगाव पोलिस स्टेशन मार्फेत करण्यात आले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या