यावल शहर

यावल तालुक्यातील एका गावात ७५ वर्षीय वृद्धेवर ४५ वर्षीय नराधमाने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. पीडित वृद्धा एकटीच असल्याचे पाहून हा नराधम पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरात शिरला होता.
सोमवारी दुपारी पीडित महिला घरात एकटीच होती. ती भुईमुगच्या शेंगा फोडत असताना शहरातील रहिवासी रवी चव्हाण (वय ४५) हा घराबाहेर आला. त्याने वृद्धेकडे पाणी पिण्यासाठी मागितले. यानंतर महिला पाणी घेण्यासाठी घरात आत गेली.
यावेळी चव्हाण तिच्या पाठोपाठ घरात शिरला. त्याने महिलेवर झडप घालून तिला घराच्या मागील स्वयंपाक खोलीत ओढून नेत बळजबरीने अत्याचार केला.
घडलेल्या या प्रकारामुळे वृद्ध महिला प्रचंड घाबरली. समाजात बदनामी होईल या भीतीपोटी गप्प राहिली. मात्र, कुटुंबाकडे घडलेला प्रकार कथन केल्यानंतर मंगळवारी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितास अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास फैजपूर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करत आहेत.


