Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»संगीत विश्वातील अजरामर ‘तारा’ निखळला!
    संपादकीय

    संगीत विश्वातील अजरामर ‘तारा’ निखळला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 12, 2026No Comments110 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीयी लेख 

    सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मराठी, हिंदी संगीतविश्वातील अजरामर तारा श्रीमती आशा भोसले यांचे दुःखद निधन काल झाले. छातीत दुखायला लागले म्हणून त्यांना ब्रिच कॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे त्यांची प्राणज्योत मालावली त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला होता. आणि काल 11 एप्रिल 2026 रोजी त्यांचे निधन झाले. म्हणजे वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ ही पाच भावंडे नुकतीच लता मंगेशकर यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरता तोच आशा भोसले यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. सात दशक संगीतात राज्य करणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘माझा बाळ’ या चित्रपटात गायनाला सुरुवात केली. सुमारे 900 हून अधिक चित्रपटात त्यांनी गाणी गायली आहेत. एकूण वीस भाषांमध्ये 20 हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली असून ती लोकप्रिय झाली आहेत. ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन, खयाम आदी संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी अजरामर राहिली आहेत. आशा भोसले यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. त्या अखेरच्या श्वासापर्यंत गाणं गात राहिल्या. एक तारा लतादीदींच्या निधनाने निखळला. तर आशा ताईंच्या रूपाने मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा निखळला आहे. आशाताईंच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आशाताईंनी एक इच्छा व्यक्त केली होती, ती म्हणजे “मी गात असतानाच मला मरण यावे!” आशाताईंनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण त्या शंभर वर्षे जगायला हव्या होत्या. म्हणजे एक स्वर साम्राज्ञीची शंभरावी साजरी करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असता. पण ते विधीला मान्य नव्हते. त्यांनी आधीच त्यांना घेऊन जावे लागले. आशा भोसलेंना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र भूषणनेही त्यांना गौरविण्यात आले होते. संगीताच्या सर्वच क्षेत्राला त्यांनी हात घातला होता. अगदी अलीकडची गाणी आणि एकदम जुनी गाणी यानंतर यांचा तर त्यांच्याजवळ मिलाप होता. शास्त्रीय संगीतामध्ये आशाताईंच्या निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून निघणार नाही. आशा भोसले यांच्या व्यक्तिगत जीवनात अनेक अडथळे निर्माण झाले, पण त्या कधी डगमगल्या नाहीत. प्रत्येक प्रसंगाला एकदम धिरोदात्तपणे त्यांनी तोंड दिले आणि प्रत्येक बाबतीत त्या सावरल्या. रेकॉर्ड ब्रेक आशा भोसले यांची गाणी म्हणून त्यांचा गौरव व्हायचा. आशा भोसले यांच्या निधनाने त्यांचा प्रवास जरी थांबला असला तरी त्यांच्या संगीताच्या सुरांचा प्रवास मात्र थांबणार नाही, तो चालतच राहणार आहे. एवढे मात्र निश्चित आशाताईंच्या आवाजात जगाला भुरळ घालणारी किमया होती. आशा भोसले यांना कुणाच्या आवाजाची कॉपी केली नाही. त्यांनी स्वतःचा वेगळा आवाज निर्माण केला होता त्यामुळे आशा भोसले यांची आवाजातील प्रत्येक गाण्यात वेगळेपण असायचे ती त्यांची खास शैली होती..

    आज आशाताई भोसले यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. अनेक नामवंतांनी आपल्या शब्दांमध्ये आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रातील नेते शरद पवार यांचे यांचा त्यात समावेश आहे. संगीत विश्वातील एक तारा निखळला. अशा प्रकारे आज आदरांजली वाहिली जात आहे. तसेच संगीत क्षेत्रातून अनेकांनी आदनांजली वाहिली आहे. काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर परळी येथे अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात येणार आहे. दिवसभराच्या अंत्यदर्शनानंतर सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क मैदानावर त्यांचा अंत्यविधी होणार आहे. आशा भोसले यांचे लग्न 1949 साली गणपत भोसले यांच्यासोबत झाले होते तर दुसरे लग्न आर. डी. बर्मन यांच्यासोबत झाले होते. ओ. पी. नय्यर यांच्याबरोबर बाराव्या वर्षी चित्रपट गायनाचा कार्यक्रम सुरू सुद्धा लक्षात राहण्यासारखा आहे. आशा भोसले आज आपल्यात राहिल्या नाहीत, पण त्यांचे संगीताचे स्वर हे आपल्या सोबतच आहेत. आशा भोसलेंच्या निधनाने एक युगाचा अंत झाला आहे. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे. त्यांची गाणी आणि त्यांच्या आवाजावर प्रेम करीत राहणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्या वयाची 93 वर्षे पूर्ण आपले जीवन व्यतीत केले आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराला त्यांच्या गाण्यावर प्रेम करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. दैनिक लोकशाही समूहातर्फे कै. आशा भोसले यांना आदरांजली..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!

    May 13, 2026

    इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा!

    May 7, 2026

    विजय थलपती यांच्या शपथविधीची जोरदार तयारी!

    May 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif