अपघातात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जळगांव ते भडगाव जाणाऱ्या खाजगी वाहनास भरधाव वेगाने असलेल्या मालवाहु महिंद्रा पिकअपने जोरदार धडक दिल्याने प्रवासी वाहनातील ११ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातात प्रवासी वाहन हे रस्त्याच्या खाली जावुन पलटी झाले.

सविस्तर वृत्त असे की, दि. १० आॅगस्ट रोजी ११ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे प्रवासी वाहतूक करणारी खाजगी टाटा मेक्सिमा (क्रंमाक – एम. एच. १५ इ. एक्स. १८३२) ही प्रवासी घेऊन निघाली. दरम्यान शिरसोली येथे आल्यानंतर दापारो (शिरसोली) येथील रहिवाशी भगवान सोनवणे यांनी पत्नी अनिता भगवान सोनवणे व त्यांचा ११ महिन्याचा चिमुकला गणेश यास भडगाव येथे माहेरी रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी मेक्सिमा गाडीत बसवुन भगवान सोनवणे हे माघारी फिरले.

दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास खेडगाव (नंदीचे) जवळ पाचोऱ्याहुन भरधाव वेगाने जाणारी मालवाहु महिंद्रा पिकअप (क्रंमाक – एम. एच. १९ सी. वाय. ९२२३) ने मेक्सिमोला जोरधार धडक दिली. या धडकेत प्रवाशांनी भरलेली मेक्सिमो ही रस्त्याच्या खाली जावुन पलटी झाली. या अपघातात गणेश भगवान सोनवणे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचा वाहनाखाली दबुन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर भैय्या कोळी (चालक) रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा, अनिता पवन चव्हाण (वय – ३८) रा. कोकडी तांडा ता. पाचोरा, सुशिलाबाई धनराज राठोड (वय – ३८) रा. रामदेववाडी ता. जळगांव, विकास सुरेश पवार (वय – २७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, आदित्य विकास पवार (वय – ७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, अनिता भगवान सोनवणे (वय – २२) रा. दापोरा (शिरसोली), लता गोकुळ राठोड (वय – ३७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, ऋषीकेश प्रदिप पंडित (वय – १६) रा. लासगाव ता. पाचोरा व निकीता गोकुळ राठोड (वय – १४) रा. रामदेव वाडी ता. जळगांव हे ९ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, समीर पाटील, संदिप भोई व योगेश पाटील हे तात्काळ हजर होवुन अपघातग्रस्तांना मदत करत त्यांना रुग्णालयात हलवुन वाहतुक सुरळीत केली. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन महिंद्रा पिकअप चालकास पाचोरा पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास पोलिस करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.