अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच ऑफर, डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाच ऑफर करणाऱ्या डिझायनर विरोधात गुन्हा नोंदविला आहे. मृता फडणवीस यांना अनिष्का नावाच्या महिलेने अप्रत्यक्षरीत्या धमकावलं. त्यांच्या विरोधात कट रचून 1 कोटींची लाच ऑफर केली. संबंधित आरोपी महिला जवळपास 16 महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी या महिलेने केली आहे. तुम्हाला 1 कोटी देऊ, अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी दिली होती. अमृता फडणवीस यांना फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी महिला डिझायनर असल्याने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. आरोपी महिलेचे नाव अनिष्का असे असून तिच्या वडिलांनाही या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.