लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. सध्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आल्या आहे. यावेळी त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आल्या असून त्यांचा ‘मूड बनालिया’ हे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला तब्बल 3 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
https://twitter.com/i/status/1611668779347611652
या गाण्यावर नेटकरी अनेक मजेशीर कमेंट्स देखील करत आहे. अमृता फडणवीस यांचा नुकतेच रिलीज झालेलं ‘आज मैं मूड बना लिया’ गाणं एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यामध्ये प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज बघायला मिळाला आहे. या गाण्यामध्ये त्यांनी डान्स देखील केला आहे.
त्यांचं गाणं ऐकून आणि डान्स बघून नेटकरी कमेंटच्या माध्यमातून त्यांची खिल्ली उडवत आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर एक नेटकरी कमेंट करताना म्हणतोय कि, हे गाण ऐकून 5 वर्षापासून कोमात असलेले माझे मामा कोमातून बाहेर आले…. त्यांनी उठून स्वत:च्या हाताने TV बंद केला….Thank you so much.नेटकरी अशा प्रकारच्या कमेंट्स करत अमृता फडणवीस यांच्या गाण्याची खिल्ली उडवत आहे.