Friday, May 20, 2022

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे स्वयंरोजगार विभागाच्या वतीने आयोजित मेळाव्याला भव्य प्रतिसाद….

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अमरावती ; अमरावती येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगारात होणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. स्थानिक व्यावसायिक व्यवसाय कसा वाढवायचा या संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य रोजगार विभागाचे प्रमुख डॉ. ओंकार हरी माळी यांनी व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेतल्या.

- Advertisement -

युवक बचत गट तयार करणे, व्यवसायाचे कौशल्य संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिमंडळ समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.संजय खोडके साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आदरणीय शरद पवार साहेब हे रचनात्मक कामाकरिता ओळखले जातात. रोजगार व स्वयंरोजगार हा उपक्रम युवकांच्या रचनात्मक जडणघडणी करिता अतिशय महत्त्वाचा आहे.उपक्रमा करिता माझे नेहमी सहकार्य राहील.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा.प्रशांत डवरे ,माजी महापौर मा.श्री.किशोर शेळके,राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.निखील ठाकरे  कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सुशील गावंडे,शहराध्यक्ष निलेश शर्मा,शुभम नागपूरे,विद्यार्थी शहराध्यक्ष आकाश हिवसे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक दर्यापूर तालुकाध्यक्ष नितीन गावंडे, आभार भातकुली तालुका अध्यक्ष ग्रामीण अमोल भारसाकडे यांनी केले.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  विपिन शिंगणे ,आशिष श्रीराव ,कुणाल विधळे, कपिल पोटे, अँड स्वप्नील बारब्दे ,हर्षल गलबले अमोल वडस्कर, अंकुश घारड, हितेश साबळे ,मनोज गावंडे, अजय सुरडकर, शहीद भाई,शपन पटेल, धिरज निंभोरकर, आनंद येरोकार ,निखिल पुनसे ,हेमंत बोबडे,अमोल दुधाट, अनिरुद्ध होले, शैलेश राऊत,शुभम तिडके,राहुल भाकरे ,अनिकेत मेश्राम ,लंकेश मेश्राम, मयूर मुरादे ,यशवंत काळे,प्रतिक खडसे ,सागर राणे, प्रतिक भोकरे, राहुल जोशी ,शिव कुंभलकर, मंगेश ढगे,श्रेयस पेठे, शुभम पारोदे,कुणाल ठाकूर, चेतन तेलंग, पिंटू यादव,शेख सलिम, मनोज काळबांडे, रणजीत ठाकुर, पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या