Wednesday, August 10, 2022

विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या; गळा व पोटावार चाकूचे वार

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

- Advertisement -

अमरावती

परतवाडा: विवाहित प्रेमीयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी १० वाजता अकोला मार्गावरील येणी पांढरी येथील एका शेतशिवारात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

सुधीर रामदास बोबडे (वय ५२, रा. वनश्री कॉलनी कांडली) व अलका मनोज दोडके (वय ४८,रा. रामनगर कांडली )अशी चाकूने वार करीत आत्महत्या करणाऱ्या विवाहित प्रेमी युगुलांची नावे आहेत. दोघेही मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील खोलीत दोघांचे मृतदेह एकमेकाला आलिंगन घातलेल्या अवस्थेत दिसून आले.

मृतदेहाजवळ चायना चाकू आढळून आला.

त्यामुळे चाकूने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी गोवर हसन परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले व कर्मचारी पंचनामा व इतर माहिती घेत आहेत

महिला बेपत्ता झाल्याची तक्रार

मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत अलका दोडके या घरी न आल्यामुळे यांचा शोध घेण्यात आला. मोबाईलवरसुद्धा अनेकदा संपर्क केला. परंतु, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याची माहिती असून त्यांच्या परिवारांनी परतवाडा पोलिसांना  माहिती दिली होती. शोध मोहीम सुरू असताना बुधवारी सकाळी मृतावस्थेत असल्याचे उघड झाले.

गळा आणि पोटातही वार

राकेश अग्रवाल यांच्या शेतातील शेत सामान ठेवण्याच्या खोलीत दोघांचे मृतदेह रक्ताने नितचिप असलेल्या अवस्थेत आढळून आले. गळा चिरण्यासह पोटातही चाकूने वार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

फॉरेन्सिक टीम घटनास्थळी

घटना माहित घडतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, दोघांचे मृतदेह पाहता चाकून कुणी-कुणावर वार केला याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.

दोघेही विवाहित

सुधीर बोबडे याचा कांडली कविठा मार्गावर पान टपरी चा व्यवसाय आहे तर अलका दोडके या गृहिणी होत्या. दोघांचे वेगळे संसार असून मुलं-बाळं आहेत.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी  आहेत पंचनामा सुरू आहे फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. त्यानंतर पंचनामा इतर माहिती घेतल्या जाईल गळ्यावर पोटात चाकू वार केल्याचे प्रथम दृष्ट्या दिसत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या