Wednesday, August 10, 2022

पालिका आयुक्तांवर शाईहल्ला करत महिलांकडून धक्काबुक्की

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

अमरावतीचे महापालिका आयक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईहल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही महिलांनी अचानक येत आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली.

- Advertisement -

- Advertisement -

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं आहे. 12 डिसेंबरला युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यानंतर 16 डिसेंबरला तो पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती.

पुतळा का हटवला याचा जाब विचारत काही महिलांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेकली. पालिकेचे सुरक्षा रक्षक तात्काळ आष्टीकर यांच्या बचावासाठी धावले आणि प्रसंगावधान दाखवून शाईफेक करणाऱ्या महिलांना कार्यालयाबाहेर काढलं. पण यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण होतं.

पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिका आवारात सुरक्षा रक्षकासोबत पाहणी करत होते. त्यावेळी तिथे अचानक आलेल्या महिलांनी घोषणाबाजी करत आयुक्तांवर शाई फेकली.

दरम्यान, ज्यांनी अमरावती आयुक्तांवर शाई फेकली त्यांच्या पाठिशी रहाणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोपही नवनीत राण यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?
अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पक्षाने 12 डिसेंबरला मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. पण हा यासाठी कोणतीही परवानगी घेतल्याने 16 डिसेंबरला पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला होता.

आमदार रवी राणा यांनी महानगरपालिकेत बैठक घेऊन या पुतळ्याला सर्व परवानग्या तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. तसंच पुतळा हलविल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा सुद्धा आमदार रवी राणा यांनी दिला होता.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या