अमळनेर तालुक्यात जीबीएसचा रुग्ण आढळला

0

अमळनेर तालुक्यात जीबीएसचा रुग्ण आढळला

अमळनेर (प्रतिनिधी)
तालुक्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएसचा रुग्ण आढळला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, जीबीएस संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.
तालुक्यातील एका गावातील वय १८ वर्षाचा तरुण पुण्याला बीसीएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. २२ फेब्रुवारीला तो अमळनेर येथे आला होता. येथे आल्यानंतर त्याला २७फेब्रुवारीला घश्यात खवखव सुरू झाली. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर ही त्याला बरे वाटत नव्हते. यातच पायाला अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर त्याला डॉ. पंकज महाजन यांच्याकडे उपचारासाठी पाठवण्यात आले. रुग्णाची लक्षणे जीबीएससारखी असल्याचे डॉ. महाजन यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या केल्यात. तसेच त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्याशी चर्चा करून त्या रुग्णाला जळगाव जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. जळगावला त्याच्यावर प्लाझ्मा फेरीस पद्धतीने उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.