अमळनेर, लोकशाही न्युज नेटवर्क
अमळनेरमधून संतापजनक घटना समोर आली आहे. बहिणीला शाळेत सोडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षात बसवून एका बंद पडलेल्या शाळेच्या गच्चीवर नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धककदायक घटना अमळनेर येथे मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीचे तोंड दाबून
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका शाळेत इयत्ता बारावीचे शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला शाळेत सोडण्यासाठी सकाळी ११ वाजता गेली होती, बहिणीला शाळेत सोडल्यानंतर ती मुलगी घरी परत येत असताना तिच्या मागून असलेल्या दिनेश शांताराम भिल (रा. शांताबाई नगर) याने मुलीचे तोंड दाबले. त्यानंतर समोरुन येणाऱ्या रिक्षाला थांबवून त्याने आम्हाला पिपळे रोडवरील आयटीआयला सोड असे सांगितल्याने रिक्षावाल्याने सोडल्यावर संशयित दिनेशने त्या मुलीला बळजबरीने त्या ठिकाणावरील बंद शाळेच्या जिन्यावरून गच्चीवर नेत त्याठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला.
माझ्याशी लग्न कर नाहीतर
तसेच दिनेश भिल याने कुटुंबीयांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा केला असता तिला कोणाचीही मदत मिळाली नाही. तसेच आरोपीने तिला माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्यासह तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली.
पुरावे गोळा
दरम्यान तेथून मुलगी घराच्या दिशेने जात असतांना तीला रस्त्यात तीचे आई वडील भेटले. त्यांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेवून पोलीस ठाण्यात धाव घेतली. न्यायवैद्यकीय पथकाची पाहणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी करीत तेथून पुरावे गोळा केले.
पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल
पडीत मुलीने आईसोबत अमळनेर पोलिसात धाव घेतली. पोलिसांना घडलेली घटना सांगितल्यानंतर संशयीत दिनेश भील याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.