Sunday, May 29, 2022

अमळनेर भाजप युवा मोर्चातर्फे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंच्या पुतळयाचे दहन

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांनी माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व वाचाळवीर नाना पटोले यांनी काल भंडारा जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ” मी मोदींना मारू शकतो व मी मोदींना शिव्या ही देऊ शकतो” असे बेताल वक्तव्य करून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अपमानच केलेला नाही तर एक प्रकारे मा. पंतप्रधान यांना धमकी देणारे वक्तव्य केले. यावरून कांग्रेसची मोदीजी बद्दलची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते.

- Advertisement -

या वक्तव्यच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नाना पटोले यांच्या पुतळ्याचे आज दहन केले. तसेच आम्ही भाजपा युवा मोर्चा लेखी तक्रार देखील अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये देणार आहेत. जर नाना पटोले यांना अटक झाली नाही तर भाजपा युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल असे देखील सांगण्यात आले.

याप्रसंगी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष योगीराज चव्हाण, सरचिटणीस राहुल चौधरी, उपाध्यक्ष हिरालाल पाटील, दिपक महाजन, गौरव महाजन, गौरव सोनार, सुमीत हिंदुजा, शुभम पाटील, कमलेश वानखेडे, सचिव किरण बोरसे, जगदीश पाटील, प्रसिद्धी प्रमुख सौरभ पाटील, सागर बारी, कपिल पाटील, प्रविण पाटील समवेत भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या