अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. काल तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत आढळला आला होता. याबाबत मोठा खुलासा झाला असून अनैतिक संबंधातून प्रियकरासह पत्नीने पतीचा खून केला आहे.
अमळनेर तालुक्यातील मारवड गावातील तरुणाचा मंगरूळ एमआयडीसीत डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना समोर आली आहे. तुषार चिंधु चौधरी असे मयत तरुणाचे नाव आहे. तो 37 वर्षाचा आहे. मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.
पतीचा निर्घृण खून
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार हा मूळचा मारवड येथील राहणारा आहे. तो 5 तारखेला रात्री उशिरापर्यंतघरी आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तुषार मंगरूळ येथे जखमी अवस्थेत पडला असल्याचे समजले. तुषारच्या कपाळावर डोक्यावर दगडाने वार केलेला होता. त्याच्या डाव्या कानाजवळ आणि डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्या. पोलीस ठाण्याचे प्रभारी डीवायएसपी धनंजय वेरूळ यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याच पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लग्ना अगोदरच प्रेमप्रकरण
तुषारला दोन मुलं आहेत. तो पत्नी पूजासह राहत होता. पूजाचे सागर चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण होतं. सागर हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा राहणारा आहे. सागर अनेकवेळा अमळनेरला येऊन पूजाला घेऊन बाहेर जात होता. विशेष म्हणजे सागरचं लग्न झालेलं आहे. त्याला एक मुलगी आहे. पण त्याची बायको त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे त्याने पूजाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजाही लग्नाला तयार झाली होती. पण तुषार हा आपल्यात अडथळा बनेल म्हणून त्याने तुषारचा काटा काढायचा निर्णय घेतला. पूजा मात्र सागरला मारू नको असं सांगत होती. तरीही सागर निर्णयावर ठाम होता. पूजाने तुषारला बोलावून घेतलं होतं. माझा नातेवाईक येत आहे. त्याच्यासोबत लग्नाची पत्रिका वाटायला जा, असं तिने तुषारला सांगितलं. त्यानंतर सागर आला आणि तो तुषार सोबत गेला. दोघेही दारू प्यायले. त्यानंतर दोघे मंगरुळला गेले. तिकडे गेल्यावर सागरने तुषारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सहा तासातच लावला तपास
पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोबाईल फोन, लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपसले. त्यानंतर एक पथक दोंडाईचा येथे पाठवले. सागरने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्याचे मोबाईलचे दुकान होते. पण हत्येनंतर अवघ्या सहा तासातच पोलिसांनी त्याच्यावर त्याला अटक केली. तुषारची अंत्ययात्रा झाल्यावर पोलिसांनी पूजालाही ताब्यात घेतलं. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.