Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांसाठी मुक्ताई मार्ट
    जळगाव जिल्हा

    स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांसाठी मुक्ताई मार्ट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 22, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‛मुक्ताई मार्ट’ ला मंजुरी मिळाली असून धुळे रोडवर पंचायत समिती सभापती बंगल्याशेजारी मुक्ताई मार्ट उभारण्यात येणार आहे.

    ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू लागला आहे. विविध प्रकारच्या वस्तू, नियमित लागणारे खाद्य पदार्थ, बनवून रास्त भावात विक्री केले जातात. मात्र महिलांनी बनवलेला माल विक्री करायला जागा नाही, आणि शहरातील महागड्या जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स परवडणारे नाही. म्हणून एकाच ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व बचत गटांसाठी बाजार पेठ उपलब्ध झाली तर महिलांना आपल्या मालाची विक्री करणे सुलभ जाईल. म्हणून ग्रामविकास विभागाच्या निधीतून १३ लाख ४६ हजार रुपये किमतीची ‛मुक्ताई मार्ट’ संकल्पना अमलात आणली गेली. पंचायत समितीच्या सभापती बंगल्या शेजारी असलेल्या सभागृहात मुक्ताई मार्ट उभारले जाईल. यामुळे तालुक्यातील बचत गटाच्या महिला आपला उत्पादित माल विक्रीसाठी एकाच ठिकाणी आणतील. ग्राहकांना देखील बसस्थानकाच्या शेजारीच एका ठिकाणी विविध वस्तू आणि खाद्य पदार्थ मिळणार असल्याने त्यांची देखील सोय होणार आहे. बाजाराच्या तुलनेत ग्राहकांना वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होतील. यामुळे ग्रामीण महिलांची प्रगती होऊन आर्थिक स्तर उंचावणार आहे. आमदार अनिल पाटील यांनी मुक्ताई मार्ट साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी आमदारांचे आभार मानले आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #amalner Amalner MLA Anil Patil jalgaon Muktai Mart
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif