Tuesday, May 24, 2022

एकाची ४९ हजारात ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. कॅब बुकिंगच्या नावाखाली एकाला ४९ हजार रुपयात ऑनलाइन गंडवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

धनराज शंकर पाटील (वय ५०, रा. पवन चौक, देशमुख गल्ली, अमळनेर) यांना ८ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे जायचे असल्याने त्यांनी गुगलवरून एका वेबसाईटवर चौकशी केली असता त्यांना एका अनोळखी नंबरवरून माहिती पुरवण्यात आले. त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला की, ‘तुमची बुकींग होऊन जाईल’ त्यानंतर थोड्या वेळातच त्यांना मोबाईलवर व्हाट्सअपवर एक लिंक आली. त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन १०० रुपये टाकून बुकिंग करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यानुसार धनराज पाटील यांनी २ वेळा लिंकवर क्लिक करून ओपन करण्याचा प्रयत्न केला पैश्यांचा व्यवहार झाला नाही.

त्यानंतर त्यांनी एक वेळेस प्रयत्न केला असता त्यांच्या अकाउंटमधून १०० रुपये कमी झाले. सायंकाळी ‘ट्रॅव्हल गुरु’ नावाची एपीके फाईल व्हाट्सअपवर पाठवले आणि ॲप डाऊनलोड करून सर्व ऑप्शन चालू करा, असे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी सर्व ऑप्शन Allow केले. काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार रुपये ऑनलाईन कमी झालेल्याचा मॅसेज आला.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल सारखा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल अहिरे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या