Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»प्रेमसंबंधाच्या संशयावरून तिघांवर चाकू हल्ला
    जळगाव जिल्हा

    प्रेमसंबंधाच्या संशयावरून तिघांवर चाकू हल्ला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 26, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तालुक्यातील जानवे येथे प्रेमसंबंधाच्या संशयावरून एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील जानवे येथे २४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, विजय उर्फ भाया साहेबराव पारधी यांनी दवाखान्यातून जबाब दिला की २४ रोजी रात्री १० वाजता गल्लीत मावस बहिणीच्या आरडाओरडचा आवाज आला. म्हणून तेथे जाऊन पाहिले असता अजय मंगल पारधी हा विजयची मावस बहिण सुनीता, पती राजेंद्र व मुलगा भटू यांना शिवीगाळ करत होता. भटुवर प्रेमसंबधाचे आरोप करीत त्याला मारून टाकतो म्हणून धमकी देत होता. त्याचवेळी चुलत काकांचा मुलगा सुवालाल नाना पारधी, भास्कर बारकू पारधी हे आले आणि त्यांनी अजय पारधी याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत चाकूने सपासप वार केले.

    दरम्यान सुवालाल याच्या डाव्या बरगडीवर, उजव्या खांद्यावर तसेच पाठीवर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वार लागला. तेव्हा सुवालालची सुटका करायला गेलेल्या विजयच्या दंडाला चाकू लागला तर भास्कर पारधी याच्या मांडीला व दंडाला चाकू लागला. हे पाहून आरोपी अजयची आई मुन्नीबाई चाकू हिसकवायला आली असता तिलाही हाताला चाकू लागला. गावातील नागरिकांनी भांडण मिटवून १०८ रुग्णवाहिकेने दवाखान्यात दाखल करण्यात आले.

    विजयच्या जबाबवरून आरोपी अजय पारधी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११८(२), ३३३, ३५१(२), ३५२ १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विकास देवरे, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.

    #amalner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif