मोबाईलच्या अतिरेकामुळे लग्न व कुटुंब व्यवस्था मोडकळीस -शरद सोनवणे

0

 

गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्स विषयावर मार्गदर्शन

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क

मोबाईलचा अतिरेक झाल्याने अनेक ठिकाणी लग्न आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असून कुटुंबातील संवाद व संपर्क संपत चालला आहे,जुळलेली लग्न केवळ मोबाईल मुळे तुटत आहे,यामुळे मोबाईलचा वापर कमीतकमी करून ऑफलाईन संपर्क वाढवला पाहिजे असे प्रतिपादन अमळनेर येथील शरद सोनवणे यांनी केले.

डिजिटल डिटॉक्स या विषयावर गुजराथी महिला मंडळाच्या वतीने डिजीटल डिटॉक्सच्या उत्तर महाराष्ट्र राजदूत राजश्री पाटील यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी शरद सोनवणे तसेच आय टी प्रोफेशनल वरद इन्फोटेक कॉम्प्युटर च्या संचालिका कु संध्या लोहार मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.यावेळी शरद सोनवणे यांनी ऑफलाइन येण्याबद्दल सर्वांचे प्रबोधन केले.

कु.संध्या लोहार यांनी महिलांशी संवाद साधताना डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? आहे “स्मार्ट गॅजेट्स स्मार्टी चा वापर” डिजिटल डिटॉक्स महत्वाचे का आहे?? हे तुमची उत्पादकता, झोप, आरोग्य सुधारते आणि तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करते. विषारी सामग्रीऐवजी आरोग्यदायी सामग्रीचे सेवन करा आणि त्यात सामील व्हा असे आवाहन केले.तसेच “ऑफलाईन इज द न्यू लक्झरी” हे ब्रीदवाक्य त्यांनी सर्वाना दिले

तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर घातक-राजश्री पाटील

डिजिटल डीटॉक्स च्या राजदूत सौ राजश्री पाटील यांनी मोबाईल सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर, यामुळे कुटुंबातील आणि, समाजातील सर्वात मोठी समस्या निर्माण होत आहे ,तसेच तरुण पिढीसाठी एक मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे.यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांच्यातील समतोल जीवनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काय केले जाऊ शकते ?यावर आपण हे कसे नियंत्रित करू शकतो?
समाजात सोशल मीडियाचा समतोल साधण्याचा दृष्टिकोन कसा शिकवायचा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी जागतिक डिजिटल डिटॉक्स डे फाउंडेशननेच्या वतीने उपस्थिताना दिली. तसेच मानवी जीवन आणि तंत्रज्ञान यामध्ये चालत असलेल्या समस्येवर अवेयरनेस करुण त्यावर उपाय देख़िल सांगत टर्नऑफ़ होऊन ट्यून इन का करायचे हे सांगीतले.

दरम्यान डिजिटल डीटॉक्स म्हणजेच (डबल्यू डि डिडि )एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी डिजिटल नैतिकता, डिजिटल शिष्टाचार, डिजिटल शिक्षण .डिजिटल फॉस्टिंग आणि मानव जीवनात सुसंवाद निर्माण करण्यासाठी काम करते. गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्सच्यव जनजागृती मोहिमेच्या मिशनला सर्व महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी गुजराथी मंडळाच्या संचालिका सुनंदाबेन गुजराथी व उपाध्यक्षा सौ लता प्रेम शाह यांनी राजश्री पाटील तसेच शरद सोनवणे व संध्या लोहार यांचा सत्कार केला.कार्यशाळेचे नियोजन मंडळाच्या अध्यक्षा सौ भाविका जीवनांनी यांनी केले होते त्यांना मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन डॉ . मंजुश्री जैन यांनी केले.यावेळी सर्वानी दैनंदिन जीवनात डिजिटल डीटॉक्स घेण्याची शपथ घेतली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.