Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अमळनेर तालुक्यात दोघांच्या आत्महत्या ; तालुक्यात खळबळ
    गुन्हे वार्ता

    अमळनेर तालुक्यात दोघांच्या आत्महत्या ; तालुक्यात खळबळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 23, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर तालुक्यात दोघांच्या आत्महत्या ; तालुक्यात खळबळ

    अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील गांधली आणि फाफोरे या दोन गावांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या असून, या दुर्दैवी प्रकारांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही प्रकरणांत अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पहिली घटना गांधली येथे घडली. १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विजय आसाराम पाटील (वय ४५) यांनी आपल्या राहत्या घराच्या बांधकामाधीन वरच्या मजल्यावर वायरच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यांच्या पत्नीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

    दुसरी घटना फाफोरे बु येथे २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण पंडित शिंदे (वय ४०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना नातेवाइक आणि ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

    दोन्ही घटनांमुळे स्थानिकांत हळहळ व्यक्त केली जात असून, आत्महत्येची कारणे समजून घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif