अमळनेरमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात चोरी; लॅपटॉपसह इतर साहित्य लंपास

0

अमळनेरमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात चोरी; लॅपटॉपसह इतर साहित्य लंपास

अमळनेर (जळगाव): शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 3 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान घडली असून, या काळात कार्यालय बंद होते. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लॅपटॉपसह इतर महत्त्वाचे सामान चोरून नेले.

ही चोरी उघडकीस आल्यानंतर कार्यालयातील कर्मचारी स्मिता गावित यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.