Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अमळनेरमध्ये सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला
    गुन्हे वार्ता

    अमळनेरमध्ये सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 4, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    एका सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये सोमवारी घडली. सात ते आठ जणांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत संबंधिताला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. या हल्ल्यानंतर बराच वेळ सराईत बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडला होता. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, विशाल दशरथ चौधरी असं हल्ला झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. तो अनेकदा एमपीडीए कायद्यांतर्गत तुरुंगातही जाऊन आला आहे. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याने अमळनेर परिसरात आपले अनेक शत्रू निर्माण केले होते. दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्यावर सोमवारी हल्ला झाला आहे. याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.

    विशाल चौधरी हा 1 फेब्रुवारी रोजी एमपीडीएतून सुटून आला आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर अशाप्रकारची कारवाई झाली होती. दुसऱ्यांदा एमपीडीएतून सुटका झाल्यानंतर ३ फेब्रुवारीला तो बाजार समितीच्या आवारात कामासाठी आला होता. दरम्यान, त्याच्यावर सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात विशाल चौधरी याच्या डोक्यावर तीन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यानंतर तो घटनास्थळी बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

    या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केले. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तिथून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली होती. जखमीच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

     

    #amalner #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

    May 7, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif