लोकशाही न्यूज नेटवर्क
पाणी भरण्यासाठी शेतातील विहिरीजवळ गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पळासदड शिवारातील शेतात शुक्रवारीमध्यरात्रीच्या सुमारास घडली. देवीदास रामदास जोशी (वय ६२) शेतकऱ्याचे नाव आहे.
अमळनेर दरवाजा परिसरातील मराठे गल्लीत राहणारे देवीदास जोशी (वय ६२) (स्वस्त धान्य दुकानदार) शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारपर्यंत देवीदास जोशी घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षल जोशी हा मित्रांसह वडिलांना पाहण्यासाठी शेतात गेला.
देवीदास जोशी यांची मोटारसायकल होती; मात्र ते दिसून न आल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली. दुपारी दोनच्या सुमारास हर्षल जोशी यास विहिरीच्या पाण्यावर बॅटरी तरंगताना दिसली. विहिरीजवळ चिखल असल्यामुळे, तसेच पाय घसरल्याची खूण दिसून आली. शेतकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील डॉ. मुकेश चौधरी, डॉ. रोहित पुराणिक यांनी तपासून मृत घोषित केले.
देवीदास जोशी यांचे मागे पत्नी, दोन मुली, जावई व मुलगा असा परिवार आहे. देवीदास जोशी बंडू महाराज या टोपण नावाने ओळखले जात होते. हर्षल जोशी यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, विकास देशमुख पुढील तपास करीत आहेत.