धक्कादायक; जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अमळनेर शहरात स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला तर दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात तरूणावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री घडली. या दोन्ही घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला असून एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पहिल्या घटनेत अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रमात सुरू असलेला लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (२१) या तरूणावर सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. त्याला धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली. ही घटना ताजी असतांना दुसरी घटना घडली. अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावातील वैदूवाड्यात सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास नाना मंगलसिंग बारेला (२१) या तरूणाला वयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (२२) याने कुन्हाडीने वार करून नाना बारेला याचा खून केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोहेकॉ सुनील जाधव, पोकॉ राहुल पाटील यांनी सावखेडा गावातील खून प्रकरणात संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले आहे. या दोन्ही घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.