Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गलवाडे रस्त्यावर ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपयांची खंडणीची मागणी
    गुन्हे वार्ता

    गलवाडे रस्त्यावर ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपयांची खंडणीची मागणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर | प्रतिनिधी गलवाडे रस्त्यावर २७ एप्रिल रोजी पहाटे दीड वाजता ट्रक अडवून चालकाच्या गळ्याला चाकू लावून एक हजार रुपये हिसकावण्याचा आणि ट्रक मालकाकडून एक लाख रुपयांची मागणी करत खून करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. अमळनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगार कैलास नवघरे याला अटक केली आहे.

    अनिल अश्रूबा विलग (रा. कोनोसी, ता. शिवगाव, जि. अहिल्यानगर) हे स्वप्नील झिने यांच्या मालकीच्या हायवा ट्रक (MH-16-CE-4797) चालवत होते. भुसावळहून नरडाणा येथे जात असताना गलवाडे रस्त्यावर मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी ट्रक आडवला. आरोपी कैलास नवघरे (अमळनेरचा डॉन म्हणून स्वतःची ओळख करून दिली) याने ट्रकच्या केबिनमध्ये घुसून चालकाच्या गळ्याला चाकू लावला आणि एक लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याने चालकाच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

    त्यानंतर दुसऱ्या आरोपीने आपले नाव मोझम शेख असल्याचे सांगत ट्रक मालकाला फोन करून धमकी दिली की, पैसे न दिल्यास चालकाचा खून केला जाईल. चालकालाही दबाव टाकून मालकाकडून पैसे मागवण्यास भाग पाडले. आरोपींनी ट्रक बाजूच्या कॉलनीकडे नेत असतानाच चालकाच्या सतर्कतेने मालकाने तातडीने अमळनेर पोलिसांना कळवले.

    पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच मोझम शेख व तिसरा साथीदार फरार झाला, मात्र कैलास नवघरेला पकडण्यात आले. कैलास नवघरे हा यापूर्वी खून प्रकरणात शिक्षा भोगून पॅरोलवर बाहेर होता आणि २७ एप्रिल रोजीच तुरुंगात परतण्याची त्याची मुदत होती.

    या प्रकरणी जबरी चोरी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif