जबरी लूट करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
एकाला चाकूचा धाक दाखवून खिशातील रोकड व पाकीट असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात घडली होती. याबाबत शनिवारी ११ मार्च रोजी मध्यरात्री ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.

जुबेर खान युसुफ खान (वय-३०, रा. गलवाडे रोड, अमळनेर) हा तरुण शुक्रवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता अमळनेर शहरातील गांधीपुरा भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभा असतांना काजल उर्फ रफिक शेख रशीद, शाहरुख अली अख्तर आली पठाण आणि अरबाज उर्फ काल्या अली अख्तर अली पठाण तिघे रा. गांधीपुरा यांनी जुबेर खान याला पोटावर चाकू लावून खिशातील रोकड काढण्यास सांगितले. त्यानंतर पैसे दिले नाही म्हणून एकाने चाकूने वार करून पायाला दुखापत केली. तसेच गळ्याला चाकू लावून त्याच्या खिशातील ३ हजार ६०० रुपयांची रोकड आणि पाकीट जबरदस्तीने हिसकावून लांबविण्याची घटना घडली . जखमीवस्थेत जुबेर खान याने अमळनेर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेला तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पुढील तपास करीत आहे.
============

Leave A Reply

Your email address will not be published.