Friday, December 9, 2022

अमित ठाकरेंना मंत्रिपद ? राज ठाकरेंचा खुलासा

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यात मोठ्या सत्ता संघर्षांनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारचे अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार ? याकडे राज्यातील संपूर्ण जनतेचं लक्ष लागले आहे. त्यातच एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नव्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरे देखील असणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या.

- Advertisement -

भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करुन स्वतःकडे उपमुख्यमंत्री ठेवले आहे. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी सभागृहात भाजपच्या बाजूने मतदान केल्यानंतर भाजप सेनेला आणखी एक धोबीपछाड देण्यासाठी नवीन डाव टाकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आता राज ठाकरेंकडून याबाबत खुलासा करण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

राज ठाकरेंनी स्वतः अमित ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबतच्या बातमीचे खंडन केलॆ आहे. त्यामुळे अमित ठाकरेंच्या मंत्री पदाबाबतची मोठी चुकीची असल्याचे स्पष्ट झालं आहे. ही बातमी धांदात खोटी असून खोडसाळ आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरण निर्मिती करत असल्याचे राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितल्याचे समजते.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बुधवारी भेट होणार होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या