मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मुंबई सोडणार आहे. आमिर खान पुढील काही महिने सर्व कामकाज चेन्नईतून करणार असून, तशा हालचाली सुरु केल्या आहेत. आमिर खानची आई झिनत हुसैन आजारी असून त्यांच्यासाठी आमिर खानने हा निर्णय घेतला आहे. आईसाठीच आमिर खान काही महिन्यांसाठी मुंबई सोडून चेन्नईत स्थायिक होणार आहे. आई खूप आजारी असल्याने, या कठीण काळात तिच्यासोबत राहता यावं यासाठी आमिर खानने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानसाठी त्याचं कुटुंब फार महत्त्वाचं असून पुढील दोन महिन्यांसाठी तो तात्पुरता चेन्नईत स्थायिक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानच्या आईची प्रकृती मागील बऱ्याच काळापासून बरी नाही. सूत्रांनुसार, आमिरची आई आजारी असून सध्या चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या कठीण काळात आपण आईसोबत असावं अशी आमिरची इच्छा आहे. यामुळेच आमिरने पुढील दोन महिन्यांसाठी रुग्णालयाजवळच आपला बेस उभारत तिथून काम करण्याचं ठरवलं आहे.