Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आयटी कंपनीतील हिंदू मुलींचे धर्मांतर करून मानसिक छळ!
    • रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!
    • जिल्ह्यासाठी पुढील आठवडा ठरणार तापदायक!
    • नवनियुक्त सीर्इओ करिश्मा नायरांनी पदभार स्वीकारला
    • तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    • जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीची चकाकी वाढली
    • शूद्रातिशूद्रांना हक्काची जाणीव करुन देणारे : ‘क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले’!
    • हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अमेरिकेचा भारताला मोठा धक्का : ट्रेड डीलनंतर चक्क यूटर्न
    ताज्या बातम्या

    अमेरिकेचा भारताला मोठा धक्का : ट्रेड डीलनंतर चक्क यूटर्न

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 11, 2026No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमेरिका आणि भारतामध्ये मोठी ट्रेड डील झाली आहे. ही ट्रेड डील अनेक अर्थांनी दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे. अमेरिकेसोबत ट्रेड डील होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. या ट्रेड डीलपूर्वी भारतावर 50 टक्के टॅरिफ होता, तो आता 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, अमेरिकेकडून आशिया खंडात ज्या -ज्या देशांवर टॅरिफ लावण्यात आला आहे, त्या सर्व देशांपेक्षा हा टॅरिफ कमी आहे, दरम्यान भारतानं रशिया आणि इराणकडून तेलाची खरेदी करू नये, त्याऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी वाढवावी, अशी एक अट देखील ट्रम्प यांनी ठेवली आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

    अमेरिकन व्यापारी प्रतिनिधी कार्यालयने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भारताचा एक नकाशा प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे अधिकृतरित्या भारताचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा नकाशा गेल्या आठवड्यात भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील घोषणेदरम्यान प्रसिद्ध करण्यात आला होता. अमेरिकेनं जारी केलेल्या भारताच्या या नकाशाची जगभरात चर्चा सुरू झाली होती.

    हा नकाशा अमेरिकेकडून यापूर्वी जारी करण्यात येत असलेल्या भारताच्या नकाशापेक्षा वेगळा होता. अमेरिकेकडून जो जुना भारताचा नकाशा दाखवण्यात आला आहे, त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा भाग वेगळा दाखवण्यात आला आहे. मात्र ट्रेड डीलनंतर अमेरिकेनं जो नकाशा दाखवला त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अधिकृत भाग असल्याचं दाखवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर आता अमेरिकेनं मोठा युटर्न घेतला आहे.

    युएसटीआरने साईटवरून नकाशा हटवला

    युएसटीआरने आपल्या साईटवरून हा नकाशा हटवला आहे, अमेरिकेनं जेव्हा हा नवा नकाशा जारी केला होता, तेव्हा भारतामधून आनंद व्यक्त करण्यात आला होता, तर या नकाशावर पाकिस्तान आणि चीनकडून आक्षेप घेण्यात आला होता, दरम्यान त्यानंतर आता हा नकाशा अमेरिकेकडून हटवण्यात आला आहे, विवाद टाळण्यासाठी अमेरिकेनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

    America American traders China Donald Trump map pakistan tariffs trade deal U-turn USTR
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    खरात पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा ‘हवाला रॅकेट’

    April 5, 2026

    “हा सर्वच किती योगायोग आहे. कमाल आहे!”

    March 24, 2026

    युद्धामुळे भारतासमोरही अप्रत्यक्ष अडचणी! : पंतप्रधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.