अर्णव सराफ यांचे अमेरिकेत निधन

0

अर्णव सराफ यांचे अमेरिकेत निधन
जळगाव प्रतिनिधी येथील मुळजी जेठा महाविद्यालयातील प्राध्यापिका शमा सराफ व जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचे सुपुत्र अर्णव सराफ (वय 26) यांचे दु:खद निधन झाले. अर्णव हे
गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत होते. तेथील संध्याकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता त्यांचे निधन झाले. सुबोध व शमा सराफ हे मुंबर्इ येथून अमेरिकेकडे रवाना झाले असून अर्णव यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमेरिकेतील प्रचंड थंडी सहन न झाल्याने रक्तदाब कमी झाल्यामुळे अर्णवचे निधन झाले. अर्णव यांच्या पश्चात आर्इ-वडील, भाऊ असा परिवार आहे. सुबोध व शमा सराफ हे जळगावातील सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रभागी असतात, रोटरी क्लबच्या माध्यमातून ते सक्रिय असून सुबोध सराफ प्रसिद्ध कलाकार-चित्रकार आहेत. अर्णव यांच्या निधनाचे वृत्त कळताच नातेवार्इ, मित्र परिवार यांनी जळगाव येथील निवासस्थानी गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.